MAHATMA GANDHI MISSION

Krishi Vigyan Kendra

(Indian Council of Agricultural Research, New Delhi)
Gandheli, Tq. Dist. Aurangabad (M.S.) 431007
Tel. 09404997772, Email: mgmkvk@gmail.com, Website: www.mgmkvk.com

मराठवाड्यकरिता चालू आठवडयातील हवामान अंदाज (10/04/19 to 14/04/19)
click here..


Aurangabad District map

कृषि सल्ला


राज्यस्तरीय अँग्रोअ़ँडव्हायजरी समितीच्या दि. ०९/०४/२०१९  च्या बैठकीतील कृषि हवामान विषयक संदेश खालीलप्रमाणे आहे.

हवामानाचा अंदाज

  1. कोकणामध्ये पुढील ५ ही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
  2. मध्य महाराष्ट्रात व मराठवाडयात दिनांक ९ व १० एप्रिल २०१९ रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ११,१२ व १३ एप्रिल २०१९ रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  3. विदर्भात दिनांक ९, १० व १३ एप्रिल २०१९ रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ११ व १२ एप्रिल २०१९ रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इशारा

  1. मराठवाडयामध्ये दिनांक ११ व १२ एप्रिल २०१९ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना,

      विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  1. मध्य महाराष्ट्रामध्ये दिनांक ११ एप्रिल २०१९ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कृषि सल्ला -

  1. ऊस पिकावर खोडकिड दिसून आल्यास क्लोरॅन्ट्रनिलोप्रोल (Chlorantraniliprole)  १८.५ % एस सी  ३ ते ४ मिली प्रति १० लीटर पाण्यातून अथवा ०.४ % जी १८.७५ किलो प्रति हेक्टरी वापरावे.
  2. टरबूज व काकडीवर्गीय वेलपिकांमध्ये खालच्या पानांमध्ये नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ४ % निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यु लूरची एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. दर ३ आठवड्यांनी ल्यूरची वडी बदलावी.
  3. कांदा काढणीनंतर पातीसह ३-४ दिवस शेतामध्ये सुकू द्यावा. यासाठी कांदा ओळीत ठेवून तो अर्धवटरित्या पातीने झाकावा. नंतर ४ सेंमी लांब मान ठेवून पात कापावी.
  4. फळपिकांमध्ये पाण्याचे योग्य नियंत्रण करण्यासाठी शेतातील वेगवेगळ्या पिकांचे अवशेष (पालापाचोळा,गव्हाचा कोंडा, पाचट इ.) यांचे आच्छादन करावे.
  5. सध्या तापमानातील वाढ लक्षात घेता जनावरांना शक्यतो सावलीची व्यवस्था करावी.
  6. मेंढ्यांना देवी रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देवी रोगाची लस टोचून घ्यावी.
  7. कोंबडयांचे उष्‍णतेपासून संरक्षणासाठी शेडच्या बाजूने बारदान लावावे व ते पाण्याने भिजवावे. तसेच छतावर गवताचे किंवा बारदानाचे आछादन करावे.

 

KVK Jurisdictional Area in Aurangabad District Aurangabad District map

MGM Krishi Vigyan Kendra

Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad, under the administrative control of Mahatma Gandhi Mission, Aurangabad started it’s functioning in the year 2011, with the financial support from the Indian Council of Agricultural Research, New Delhi.

Krishi Vigyan Kendra is a planned project of Indian Council of Agricultural Research, New Delhi for transfer of agricultural technology to the farming community.