MAHATMA GANDHI MISSION

Krishi Vigyan Kendra

(Indian Council of Agricultural Research, New Delhi)
Gandheli, Tq. Dist. Aurangabad (M.S.) 431007
Tel. 09404997772, Email: mgmkvk@gmail.com, Website: www.mgmkvk.com

एमजीएम कृषि विज्ञान केंद्रात महिला किसान दिवस उत्साहात साजरा

एमजीएम कृषि विज्ञान केंद्र गांधेली येथे महिला किसान दिनानिमित्य दि. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अनुराधाताई अंकुशराव कदम यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अर्चना भोसले, प्रगतीशील महिला शेतकरी, उस्मानाबाद, डॉ. रेखा शेळके, प्राचार्या, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र महाविद्यालय, औरंगाबाद व डॉ राजेंद्र रेड्डी, संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये सौ. लक्ष्मी विलासराव खंडागळे, रेणुकामाता महिला बचत गट, दौलताबाद, सौ. साखरबाई भगवान घाटे, मुंबादेवी महिला बचत गट, जुये कायगाव, सौ. केशरबाई विठठल सोनवणे, भोलेनाथ महिला बचत गट, जुये कायगाव, सौ. भारती विजय तुपे, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, भेंडाळ, सौ. सुनिता पोपट तुपे, संकल्प महिला बचत गट, सौ. जानकाबाई भगवानराव जाधव, गणेश महिला बचत गट, दहेगाव बंगला, सौ. नंदा संदीप चव्हाण, श्री साई महिला बचत गट, दहेगाव बंगला, सौ. जिजाबाई दत्तु भोगे, ज्ञानेश्वरी महिला बचत गट, जुये कायगाव, सौ. विद्या दगडू बिरुटे, सौ. संगीता दशरथ बिरुटे, मुंबादेवी महिला बचत गट, जुये कायगाव, सौ. धोंडाबाई बाबुराव पंढूरे, अहिनादेवी महिला बचत गट, सौ. नंदा दीपक जाधव, विजयश्री महिला बचत गट, सौ. भीमा एकनाथ धोंडे, दहेगाव बंगला, सौ. रंजना लक्ष्मण थोरात, सावता महिला बचत गट, दहेगाव बंगला, सौ. नंदा प्रलाद पुंड, निराई महिला बचत गट, दहेगाव बंगला. तसेच कृषि विभागाच्या श्रीमती छाया पवार, श्रीमती सोनाली पाटील, श्रीमती ज्योती पाटील, श्रीमती मयुरा दारुंटे, श्रीमती गोबिना वैराळ, श्रीमती सुवर्णा राजपूत, श्रीमती हेमलता मुळे यांचा समावेश होता.
सौ अर्चनाताई भोसले यांनी एक गृहिणी ते विजयलक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यापर्यंतची वाटचाल उपस्थित महिलांना सांगितली. तसेच मुलींना शिकवा व सक्षम करा असा संदेश दिला. डॉ. रेखा शेळके यांनी सांगितले की महिला ह्या चांगल्या प्रकारच्या व्यवस्थापक असतात त्यामुळे त्या घर, शेती, नोकरी चांगल्या संभाळु शकतात. महिलांनी धाडस केले तर काही पण करू शकतात असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ राजेंद्र रेड्डी यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की ग्रामीण महिलांनी ग्रुप करून व्यवसाय निवडले पाहिजे. एमजीएम कृषी विज्ञान केंद्र भाजीपाला रोपे, कोंबड्यांची पिले ग्रुप पर्यंत पोहोचण्यास मदत करेल, तसेच तयार झालेला माल विक्री करण्यास मदत करील असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. एन.एम. मस्के वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. वैशाली देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्वप्निल वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमजीएम हिल्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.